Pages

Sunday, March 25, 2012

टोपी पटकावण्याची निराळी जादू 
हॅट ट्रीक )

१८ व्या शतकातली गोष्ट आहे.लंडनमध्ये एका दिवशी एका छोट्याश्या मैदानावर दोन गावांमध्ये क्रिकेटचा सामना सुरु होता. अर्थातच टेस्ट सामना होता. 
तो सामना बघायला दोन्ही गावातली भरपूर लोकं व दोन्ही गावांचे राजे हा सामना बघायला आले होते. पहिले ३ दिवस खूप रटाळ गेले.
 सगळे खूप हळू हळू खेळत होते. एखाद-दुसऱ्या विकेट गेल्या. तरी पण कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. दोघांनाही जिंकायच्या समान संधी होत्या.
सगळे प्रेक्षक खूप कंटाळलेले होते. जसजसा दिवस संपायचा तसतसे प्रेक्षक कमी होत जायचे. पण कोणालाही हे माहित नव्हतं की याच सामन्यात एक 
अनोखी गोष्ट होणार आहे.
      
आता चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला होता. सुरवात रटाळच झाली. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या ३-४ विकेट गेल्या असतील. षटक संपलं.आता एक
उंच गोलंदाज गोलंदाजी करायला आला. त्याने चौथ्या चेंडूवर एका फलंदाजाला बाद केले. सगळ्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटले.
त्यानंतर पुढचा फलंदाज फलंदाजीला आला. गोलंदाजाने चेंडू टाकला. एकाएकी शांतता पसरली. कारण पुन्हा फलंदाजाची विकेट गेली होती.
आता त्या संघाचे सगळे फलंदाज संपले होते, म्हणून एक गोलंदाज फलंदाजीला आला. सगळीकडे शांतताच होती. आणि अचानक अजून एक विकेट 
गेली. सगळे चाहते तल्या वाजवू लागले.

काही वेळानी दिवस संपला तेव्हा त्या गावाचा राजा त्या गोलंदाज कडे आला आणि त्याला स्वतःची टोपी गिफ्ट म्हणून दिली 

म्हणून या जादुस नाव पडले 'हॅट ट्रीक'





गोलंदाजाला मिळालेली टोपी  

5 comments:

आशा said...

भारीच!!

सचिन said...

अरे वा! खूप मजेशीर माहिती आहे ही. मी हा शब्द कायम हॅट्रीक असाच वाचत आलो आत्तापर्यंत.

- सचिन

आनंद said...

ओके ....

Gautami said...

हीहीही!! ‘लई भारी’ शिवाय दुसरं काहीच म्हणू शकत नाही! :)

विद्या कुळकर्णी said...

वा! आवडलं.
लिहिलंस तेही आणि "फक्त क्रिकेट" पुन्हा सुरू केलंस, हेही!

Post a Comment