Pages

Monday, March 26, 2012

वॉल्शची दिलदारी


मिलिन्दने जो प्रसंग लिहिला आहे तो वाचला.
मला ८७ च्या रिलायन्स वर्ल्ड कप मधील याच्या उलट घटना आठवली.

लाहोरमधे पाकीस्तान विरूद्ध वेस्ट इंडिज असा उपउपान्त्य फेरीचा सामना होता.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत २१६ धावा केल्या होत्या.
पाकीस्तानी डावाचं शेवटचं षटक बाकी होतं तेव्हा ६ चेंडूत १४ धावा हव्या होत्या.
कोटनी (कर्टनी?) वॉल्श गोलंदाजी करत होता.
अब्दुल कादीर आणि सलीम जाफर खेळत होते. नऊ गडी बाद झालेले, शेवटची जोडी खेळत होती.
त्यांनी आधी एकेक नंतर दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर कादीरने षटकार मारला.
मग दोन धावा पळून काढल्या.
शेवटच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी दोन धावांची गरज होती.
शेवटचा चेंडू टाकण्यासाठी वॉल्शने धावायला सुरूवात केली.
आम्ही श्वास रोखून हा सामना बघत होतो.
आणि त्याने चेंडू टाकलाच नाही!
सलीम जाफर जो नॉन स्ट्राईकर एन्डला ( मराठीत काय? गोलंदाजाच्या बाजूला?) होता. त्याने आधीच क्रिज सोडलेले...
नियमाप्रमाणे वॉल्श त्याला धावचीत करू शकत होता.
पण त्याने तसे केले नाही, त्याने जाफरला ते दाखवून दिले. आणि पुन्हा गोलंदाजी करायला वळला.
ग्रेट!
सामने काय जिंकले किंवा हरले जातात! पण अशी दिलदारी? क्वचित!
सामना जिंकून वेस्ट इंडिज उपान्त्य फेरीत पोचले असते..... कदाचित विश्वचषकावर नावही कोरले असते.
क्या बात है! वॉल्श आम्ही तुला विसरलो नाही, या दिलदारीसाठी क्रिकेटविश्वात तुझं नाव कोरलेलं आहे!

शेवटच्या चेंडूवर कादीरने दोन धावा काढल्या आणि ते जिंकले.

0 comments:

Post a Comment