Pages

Sunday, September 25, 2011

ब्रायन लारा

लाराचा जन्म केवळ विक्रमांवर विक्रम रचण्यासाठी झाला आहे असे म्हटले तरी चालेल. या फलंदाजाने १९९० साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा तो फारसा परिचित नव्हता. पदार्पणानंतर अवघ्या चार वर्षात त्याने गॅरी सोबर्सच्या नाबाद ३६५ धावांच्या विश्वविक्रमाला मोडीत काढले तेव्हा अवघे क्रिकेट विश्व थक्क झाले. त्यानंतर दोन महिन्यानंतर प्रथम श्रेणी सामन्यात ५०१ धावांची प्रदिर्घ विश्वविक्रमी खेळी करून त्याने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. लाराच्या या विक्रमामुळे तो महान फलंदाज आहे हे सर्वाना मान्य करावे लागले. अर्थात त्याची शैली, प्रतिमा व्यक्तिमत्व इत्यादी गोष्टींमूळे त्याला चाहत्यांचे पाठबळ मात्र दुर्दैवाने फारसे लाभत नव्हते.
लाराची फलंदाजी हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याची भलीमोठी बॅकलिफ्ट पाहूनच तो कधीही बाद होईल असे वाटते. परंतु त्याची बॅट केव्हा खाली येते आणि चेंडू सिमारेषेपार होतो हे समजत नाही. डावी यष्टी उघडी ठेवून उजवा पाय पोटाशी आणत तो पूल मारतो तेव्हाही तो त्रिफळाचीत होईल असे वाटते. मात्र याच हुकमी फटक्यावर त्याने किती धावा काढल्या असतील याची गणती नाही. हवेत किंचीत उडी मारून त्याने मारलेल्या कव्हर ड्राइव्हवरील चेंडू सहसा क्षेत्ररक्षकाच्या हाती लागत नाही. फिरकी गोलंदाज मग वार्न असो वा मुरलीधरन याने त्यांना पुढे सरसावत हवेत भरकावून दिले की तो षटकारच ठरतो. स्वत:तोही फटका मारल्यानंतर शांतपणें पाठ फिरवून क्रीजमध्ये जातो. चेंडू स्टॅण्डमध्येच जाणार याची त्याला खात्री असते!
कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यात विश्वविक्रमी खेळी केल्यानंतरही आपण आपली कारकिर्द नियोजनबद्ध आखावी असे त्याला कधीच वाटले नाही. तो त्याच्याच मस्तीत खेळत राहीला, धावात लूटत राहिला. त्याच्या टिकाकारांना त्याचा हा दोष वाटतो. लारामध्ये सात्यत नाही, तो बेभरवशी आहे अशी सर्रास टिका होऊ लागली. त्याने ही टिका कधीच मनावर घेतली नाही. वक्तृत्वापेक्षा त्याने कर्तुत्वावर भर दिला. सात्यत नाही? कदाचित नसेलही; परंतु त्याची भरपाई करण्याची धमक त्याच्यात आहे. प्रचंड आत्मविश्वास आहे. जन्मजात प्रतिभा आहे. आज याच गुणांच्या बळावर सर्वाधिक कसोटी शतकांचा विश्वविक्रम जो सध्या सचिनच्या नावावर आहे  तो वगळता दोन महत्वाचे 'विश्वविक्रम लाराने अपल्या नावावर केले आहे! कसोटी सामन्यात ३१ शतकांसह ११,९९४ धावा तो करेल असे कोणाला वाटले होते का? आणखी विशेष म्हणजे २१९ कसोटी डावांत तो केवळ वेळा नाबाद राहिला. आणि तरीही त्याची सरासरी ५३.०२ अशी भरभक्कम आहे. ही सर्व कामगिरी त्याने एका दुबळया संघाचे प्रतिनिधित्व करतांना नोंदविली आहे. ही त्याची आणखी एक जमेची बाजू आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थीतीत एकाकी लढत देत. सरस प्रतिस्पर्धी संघाविव्द्ध त्याने आपल्या संघाला अक्षरश: एक हाती विजय मिळवून दिले आहेत. मॅचविनरची उपाधी तो मोठया दिमाखाने मिरवत असतो.कशाचीही फिकीर करता तो खेळायचा. आपल्या ३७५ धावांचा विश्वविक्रम मॅथ्यू हेडन मोडल्यानंतर तों खचला नाही त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावे रचला. एवढेच नव्हे या खेळीदरम्यान ३७४ धावा असताना ऑॅफस्पिनर बेट्टीला पुढे सरसावत षटकार ठोकून हेडनच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचे धैर्य त्याने दाखवले! हे काही सोपे काम नाही. आपला फटका चुकून आपण झेलबाद झालो तर अथवा चेंडूच्या टप्प्याचा अंदाज येऊन यष्टीचीत झालो तर ही भिती त्याच्या मनाला शिवली नाही. तेव्हा तो ३७४ वर बाद झाला असता तर भविष्यात हा विक्रम मोडण्याची संधी त्याला मिळाली नसतीही! परंतु त्याने तो नेभळट विचार केला नाही अणि नाबाद ४०० धावा करून आपले वेगळे पण सिद्ध केले. दुर्दैवाने त्याला आपल्या संघाची फारशी साथ लाभली नाही. वेस्ट इंडिज नामशेष होण्याच्या बेतात असताना संघाची धुरा पुन्हा एकदा त्याच्यावर सोपवण्यात आली. विंडिज क्रिकेटच्या सार्‍या आशा त्याच्यावर एकटवल्या होत्या. आपल्याच देशात होणारी विश्वचषक स्पर्धा तो आपल्याला जिंकून देईल अशी खात्री सहकार्‍यांना आणि तेथील चाहत्यांना वाटत होती.पण दुर्दैवाने तसे झाले नाही. संघाच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्यानेही एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकादा पॅड बांधण्याचे ठरवले होते. मात्र त्याला निवृत्ती खुणावत असल्याने तसे झाले नाही हेही तितकेच खरे. त्याची कारकिर्द अगदी अतिंम वळणावर येऊन ठेपली असताना न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकून त्याने वेस्ट इंडिजला गिफ्ट दिले होते