Pages

Monday, March 26, 2012

वॉल्शची दिलदारी


मिलिन्दने जो प्रसंग लिहिला आहे तो वाचला.
मला ८७ च्या रिलायन्स वर्ल्ड कप मधील याच्या उलट घटना आठवली.

लाहोरमधे पाकीस्तान विरूद्ध वेस्ट इंडिज असा उपउपान्त्य फेरीचा सामना होता.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत २१६ धावा केल्या होत्या.
पाकीस्तानी डावाचं शेवटचं षटक बाकी होतं तेव्हा ६ चेंडूत १४ धावा हव्या होत्या.
कोटनी (कर्टनी?) वॉल्श गोलंदाजी करत होता.
अब्दुल कादीर आणि सलीम जाफर खेळत होते. नऊ गडी बाद झालेले, शेवटची जोडी खेळत होती.
त्यांनी आधी एकेक नंतर दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर कादीरने षटकार मारला.
मग दोन धावा पळून काढल्या.
शेवटच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी दोन धावांची गरज होती.
शेवटचा चेंडू टाकण्यासाठी वॉल्शने धावायला सुरूवात केली.
आम्ही श्वास रोखून हा सामना बघत होतो.
आणि त्याने चेंडू टाकलाच नाही!
सलीम जाफर जो नॉन स्ट्राईकर एन्डला ( मराठीत काय? गोलंदाजाच्या बाजूला?) होता. त्याने आधीच क्रिज सोडलेले...
नियमाप्रमाणे वॉल्श त्याला धावचीत करू शकत होता.
पण त्याने तसे केले नाही, त्याने जाफरला ते दाखवून दिले. आणि पुन्हा गोलंदाजी करायला वळला.
ग्रेट!
सामने काय जिंकले किंवा हरले जातात! पण अशी दिलदारी? क्वचित!
सामना जिंकून वेस्ट इंडिज उपान्त्य फेरीत पोचले असते..... कदाचित विश्वचषकावर नावही कोरले असते.
क्या बात है! वॉल्श आम्ही तुला विसरलो नाही, या दिलदारीसाठी क्रिकेटविश्वात तुझं नाव कोरलेलं आहे!

शेवटच्या चेंडूवर कादीरने दोन धावा काढल्या आणि ते जिंकले.

अंडर-आर्म गोलंदाजी

ऑस्ट्रेलियातील १९८१ च्या मोसमातील तिरंगी मालिकेतील (तेव्हा त्या मालिकेला वर्ल्डसेरीज असे नाव असायचे) अंतिम फेरीतील तिसरा सामना. (पाच अंतिम सामने असायचे, best of five)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील, मेलबोर्न, १ फेब्रु १९८१.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ४ बाद २३५ धावा केल्या. कर्णधार ग्रेग चॅपेलचा वाटा होता ९० धावांचा.

शेवटचे षटक चालू झाले तेव्हा न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १५ धावा हव्या होत्या. गोलंदाजी करत होता ट्रेव्हर चॅपेल. (चॅपेल बंधूंपैकी सगळ्यात लहान).

पहिल्या चेंडूवर रिचर्ड हॅडलीने चौकार मारला पण दुसर्‍या चेंडूवर बाद झाला. तिसर्‍या आणि चौथ्या चेंडूवर दोन-दोन धावा निघाल्या पण पाचव्यावर विकेट पडली. ब्रायन मॅक्केशनी हा नवा फलंदाज मैदानात होता, १ चेंडू, बरोबरीसाठी ६ हव्यात आणि जिंकण्यासाठी ७.

शेवटचा चेंडू टाकण्यासाठी ट्रेव्हर सज्ज झाला, ग्रेगने पळत जाऊन त्याला सूचना दिली, ट्रेव्हरने पळत येऊन चेंडू अंडर-आर्म सरपटी टाकला.



फलंदाजाने रागाने त्याला नुसती बॅट लावली.

ऑस्ट्रेलियाने ६ धावांनी सामना जिंकला.

नंतर सगळीकडे गदारोळ चालू झाला. न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणाले, क्रिकेटच्या इतिहासातील लाजिरवाणी घटना, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, झालं ते काही चांगलं नाही झालं..
डॉन ब्रॅडमननी या काहीही करुन जिंकण्याच्या मनोवृत्तीबद्दल खेद व्यक्त केला.

नंतर आयसीसीने नियम बदलले आणि अशा प्रकारे चेंडू टाकणे नियमबाह्य ठरवले. (टाकला तेव्हा ते नियमात बसत होते.

Sunday, March 25, 2012

टोपी पटकावण्याची निराळी जादू 
हॅट ट्रीक )

१८ व्या शतकातली गोष्ट आहे.लंडनमध्ये एका दिवशी एका छोट्याश्या मैदानावर दोन गावांमध्ये क्रिकेटचा सामना सुरु होता. अर्थातच टेस्ट सामना होता. 
तो सामना बघायला दोन्ही गावातली भरपूर लोकं व दोन्ही गावांचे राजे हा सामना बघायला आले होते. पहिले ३ दिवस खूप रटाळ गेले.
 सगळे खूप हळू हळू खेळत होते. एखाद-दुसऱ्या विकेट गेल्या. तरी पण कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. दोघांनाही जिंकायच्या समान संधी होत्या.
सगळे प्रेक्षक खूप कंटाळलेले होते. जसजसा दिवस संपायचा तसतसे प्रेक्षक कमी होत जायचे. पण कोणालाही हे माहित नव्हतं की याच सामन्यात एक 
अनोखी गोष्ट होणार आहे.
      
आता चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला होता. सुरवात रटाळच झाली. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या ३-४ विकेट गेल्या असतील. षटक संपलं.आता एक
उंच गोलंदाज गोलंदाजी करायला आला. त्याने चौथ्या चेंडूवर एका फलंदाजाला बाद केले. सगळ्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटले.
त्यानंतर पुढचा फलंदाज फलंदाजीला आला. गोलंदाजाने चेंडू टाकला. एकाएकी शांतता पसरली. कारण पुन्हा फलंदाजाची विकेट गेली होती.
आता त्या संघाचे सगळे फलंदाज संपले होते, म्हणून एक गोलंदाज फलंदाजीला आला. सगळीकडे शांतताच होती. आणि अचानक अजून एक विकेट 
गेली. सगळे चाहते तल्या वाजवू लागले.

काही वेळानी दिवस संपला तेव्हा त्या गावाचा राजा त्या गोलंदाज कडे आला आणि त्याला स्वतःची टोपी गिफ्ट म्हणून दिली 

म्हणून या जादुस नाव पडले 'हॅट ट्रीक'





गोलंदाजाला मिळालेली टोपी