Pages

Saturday, August 27, 2011

अंक ४

सचिन तेंडूलकर 



मास्टर ब्लास्टर,सच्या,तेंडल्या अशा अनेक प्रेमळ टोपण नावाने ओळखला जाणारा सचिन रमेश तेंडुलकर हा आज जगातल्या क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणारे क्रिकेटमधले अनेक विक्रम त्याने लीलया मोडीत काढले. अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आणि अजूनही वयाच्या ३९व्या वर्षी तो नवनवीन विक्रम करण्यास सक्षम आहे. कसोटी क्रिकेटमधील आणि एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक शतके हे दोन डोंगराएवढे विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्याची थक्क करून टाकणारी कामगिरी पाहिल्यावर त्याला `देव' मानणारे चाहते काही कमी नाहीत.

सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तेंडुलकर कुटुंबीयांना त्या काळातले प्रतिथयश हिंदी सिने-संगीतकार सचिन देव बर्मन यांचे संगीत फार आवडायचे. त्यामुळेच तेंडुलकरांनी त्याचे नाव सचिन ठेवले. लहानपणापासूनच सचिनला क्रिकेटचे जबरदस्त आकर्षक होते. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने सचिनचे हे क्रिकेट वेड लहानपणीच ओळखले होते. दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत शिकत असताना सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून तो क्रिकेटचे धडे गिरवायला लागला. अजित तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर या दोघांचा सचिनच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्या महानतेची चुणूक तो शाळेत असतानाच बघायला मिळाली. हॅरिस शिल्डच्या स्पर्धेत आपला मित्र विनोद कांबळीबरोबर त्याने ६६४ धावांची अफाट भागीदारी केली. तेथूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या भागीदारीनंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 

१९८८/८९ साली त्याने पहिल्यांदा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबई संघाकडून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या वेळी त्याचे वय होते अवघे १५ वर्षे आणि २३२ दिवस. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात त्याने नाबाद शतक झळकावले. रणजी चषक, दुलीप चषक आणि इराणी चषक या तीनही स्पर्धांच्या पहिल्या सामन्यांत शतक झळकवणारा तो आजपर्यंतचा एकमेव खेळाडू आहे.
त्याच वर्षी भारताच्या पाकिस्तान दौर्‍यासाठी त्याची निवड झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला त्याचा प्रवेश  

 थोडासा निराशाजनक राहिला. पाकिस्तानच्या दौर्‍यात त्याला शतक झळकवता आले नाही. त्यामुळे `शतक झळकवणारा जगातील सर्वांत तरुण खेळाडू', हा विक्रम त्याला आपल्या नावावर करता आला नाही. पहिल्या कसोटी शतकासाठी त्याला १९९० सालच्या इंग्लंड दौर्‍याची वाट पाहावी लागली. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला खरा सूर गवसला तो १९९१-९२च्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यामध्ये. या दौर्‍यात पर्थ येथे त्याने शतकी खेळी केली. सचिनला आपल्या एकदिवसीय सामान्यातील पहिल्या शतकासाठीही ७९ सामने वाट पाहावी लागली. श्रीलंकेतील कोलंबो येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ सप्टेंबर १९९४ साली त्याने एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक झळकवले. 

त्यानंतर मात्र त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करायला सुरुवात केली. तो एक एक विक्रम  मोडत गेला आणि नवीन विक्रम प्रस्थापित करत गेला.

कसोटी क्रिकेटमधील लिटिल मास्टर सुनील गावस्करच्या नावे असलेला ३४ शतकांचा विक्रम त्याने २००५ साली मोडीत काढून दिल्ली येथे श्रीलंकेविरुद्ध ३५वे शतक झळकावले. विस्डेन या खेळांसाठी वाहिलेल्या सुप्रसिद्ध नियतकालिकाने त्याला सर डॉन ब्रडमननंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित केले आहे. इतरही अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. त्याची यादी भली मोठी होईल.
एकदिवसीय सामन्यातही त्याने अनेक विक्रमांची नोंद केली. सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा (१४ मार्च २०११पर्यंत १८,००८), सर्वाधिक शतके (४८), सर्वाधिक मैदानांवर खेळी (८९), ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यू झीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्ध सर्वाधिक शतके, शंभरहून अधिक बळी, १०,००० धावा करणार्‍या खेळाडूमध्ये सर्वाधिक सरासरी... असे अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत.

सचिन तेंडुलकरला नियमित गोलंदाज म्हणता येणार नाही. नियमित गोलंदाज जेव्हा अपयशी ठरायला लागतात अशा वेळी साधारणपणे सचिनसारख्या अनियमित गोलंदाजांकडे चेंडू देण्याची प्रथा आहे. अनेक न फुटणार्‍या फलंदाजांच्या जोडय़ा फोडून सचिनने याही क्षेत्रात आपली यशस्वी कामगिरी नोंदवलेली आहे. त्याने १३२ कसोटींमध्ये ३५ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळी अशी समाधानकारक कामगिरी केली आहे. १९९७-९८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १० षटके आणि ३२ धावांत ५ बळी घेतले होते आणि ऑस्ट्रेलियाकडे पूर्णपणे झुकलेला सामना भारताकडे झुकवून दिला होता.

क्रिकेटच्या खेळातील अनेक विक्रम मोडीत असताना त्याला अनेक त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. विशेषत: शारीरिक दुखण्यांमुळे त्याला अनेकदा ग्रासले. १९९९ च्या पाकिस्तान दौर्‍यात त्याला पाठदुखीचे दुखणे जडले. २००४ साली कोपराच्या हाडाच्या (टेनिस एल्बो) दुखण्यामुळे तो बेजार झाला होता. २००६ साली त्याला दुखापतीमुळे खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. मांडय़ांच्या स्नायूतील बिघाडानेही त्याला अनेकदा त्रस्त केले आहे.

१९९९च्या क्रिकेट विश्व कपचे सामने चालू असतानाच त्याचे वडील, प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. २००६ सालच्या आसपास त्याला `बॅडपॅच'मधूनही जावे लागले. अनेक वेळा त्याला टीका सहन करावी लागली. पण या टीकेला त्याने नंतर आपल्या बॅटनेच उत्तर दिले आणि सतत १७ वर्षे खेळत वयाच्या ३९व्या वर्षीही तो तरुणांना लाजवेल असा खेळ खेळत आहे. 



(http://encyclopedia.balaee.com)



Saturday, August 20, 2011

अंक ३



कपिल देव

भारताला विश्र्वचषक मिळवुन देणारा कर्णधार चारशेच्या वर बळी घेणारा द्रुतगती  गोलंदाज एक परिपुर्ण अष्टपैलु खेळाडू आणि तंदूस्तीचा वस्तूपाठ घालुन देणारा क्रिकेटपटू म्हणून क्रिकेटविश्वात  कपिलदेवचा विशेष लौकिक आहे. विस्डेन फाईव्ह क्रिकेटर्स ऑफ द सेंच्युरी मध्ये गणना झालेला खेळाडू म्हणुनही त्याची विशेष ख्याती आहे.
कपिलदेव रामलाल निखंज याचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी चंदिगढ हरयाना येथे झाला फैसलाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्याद्वारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं व भारताला  रमाकांत देसाईनंतर गोलंदाज लाभला आणि भारतीय क्रिकेटचा एक नवा अध्याय सुरू झाला. त्याच्या परिणामकारक गोलंदाजीला आक्रमक फलंदाजीचीही जोड होती क्षेत्ररक्षणातही तो चोख होता कपिलदेवच्या अशा अष्टपैलूत्वामूळे भारतीय संघामध्ये एका अर्थाने समतोल प्राप्त झाला. केवळ २५ कसोटी सामन्यांमध्ये १०० बळी आणि १००० धावा पुर्ण करून त्याने आपलं अष्टपैलुत्व सिद्ध  केलं
आपल्या १६ वर्षाच्या (१९७८;९४) प्रदीर्घ अशा कसोटी क्रिकेट कारकीदीत त्याने १३१ सामन्यांमध्ये २९.६४ च्या सरासरीने ४३४ बळी प्राप्त केले भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा व तसेच त्याने डावात ५ वा ५ पेक्षा जास्त बळी धेण्याची किमया केली आणि ८३ धावांत ९ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. फलंदाजीतही त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे त्याने ३१.५ च्या सरासरीचा  समावेश आहे. १६३ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या
एकदिवसीय सामन्यांमधील वेगळया स्वरूपाच्या क्रिकेटशी कपिलदेवने चांगलं जुळवून  घेतलं २२५ सामन्यामध्ये त्याने २७.४५ च्या सरासरीने २५३ बळी घेतले आणि २३.७९ च्या सरासरीने ३,७८३ धावा केल्या १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याने काढलेल्या झंझावती १७५ धावाही त्याची सर्वोच  धावसंख्या आणि सर्वोतम कामगिरी ठरली या स्पर्धेतील झिबांब्वेविरूध्दच्या सामन्यात भारतीय संघाची ५ बाद २० अशी नामूष्की झाली होती तेव्हा कपिलने त्याच्या घणाघाती खेळाने  १७५ धावा करून एकहाती भारतीय संघाची नौका किनार्याला लावली होती.
कपिलच्या अष्टपैलु खेळामूळे कसोटी पदार्पण केल्यावर अल्पावधीतच त्याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सुत्र देण्यात आली कपिल परिपुर्ण कप्तान म्हणुन ख्यात नसला तरी त्याच्या जिगरबाज स्वभावामुळे भारतीय संघामध्ये सकारत्मक दृष्टीकोन विकसित झाला इतकं निश्चित.त्याने १९८३ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक प्राप्त करून दिला आणि त्यांच्या विजिगिषू प्रवृतिमूळे तो भारतीयांच्या गळयातील ताईतच झाला.
कपिलदेवच्या क्रिकेट कारकिर्दीतचतील बहूमोल कामगिरिमूळे त्याला अनेक पुरस्कार व बहूमान प्राप्त झाले. त्यांत सर्वोकूष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून  १९७८ साली अर्जुन पुरस्कार १९८० पद्मश्री १९८१ विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर १९८३ पद्मभूषण इ. पुरस्कार मिळाले . इ. स. १९९४ मध्ये कपिलदेवने निवृती पत्करली पण तंदुरूस्तीसाठी आदर्श ठरलेला हा खेळाडू पुढील पिढयातील खेळाडुंना कायम प्रेरणादायी ठरला.

(http://encyclopedia.balaee.com)

Friday, August 12, 2011

अंक २




या अंकापासून आपण क्रिकेटमधील काही दिग्गज खेळाडूंची माहिती घेऊ .

डॉन ब्रॅडमन


क्रिकेटच्या इतिसात टेस्ट क्रिकेटमध्ये ९९.९४ ची सरासरी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९५.१४ ची सरासरी राखणारा एकमेव क्रिकेटपटू डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन आपल्या अफलातून फलंदाजीमुळे आजच्या पिढीत चर्चित आणि लोकप्रिय झाले. क्रिकेटच्या इतिहासातील मागची पाने चाळून बघितली तर सर डॉन ब्रॉडमन यांच्या अद्भुत फलंदाजीबद्दल आजच्या पिढीतल्या तरूणांनाही मोंठ आश्चर्य वाटतं. विशेष म्हणजे आज क्रिकेटमधल्या सुखसोयी, पैसा हे सगळं वाढलं असतानाही ५२ कसोटीत २९ शतके ठोकणारा आणि टेस्ट क्रिकेटमधली आपली सरासरी ९९.९४ इतकी ठेवणार्‍या ब्राडमन यांच्यासारखा दुसरा क्रिकेटपटू जन्माला जायचा आहे.
ब्रॉडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ ला ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समधल्या कुरमुंडरा गावात झाला. इथेच ब्रॅडमन यांचं बालपण गेलं. नंतर त्यांचा परिवार बाऊरल इथे आला. कारण त्यांच्या वडिलांना तिथे सुताराचे काम मिळाले होते.लहानपणी ब्रॅडमन एका गोल्फच्या चेडूने क्रिकेट खेळायचे. आपल्यासोबत खेळायला कुणी नसलं की बॅ्रडमन एका मोठया पाण्याच्या टाकीवर जोरात चेंडू फेकून मारायचे  आणि मग तो मारलेला चेंडू परत आपल्याकडे आला की ते त्याच्यावर वेगवेगळे स्ट्रोक मारायचे. त्या वेळी त्यांच्या हातात बॅट एवजी एक स्टंम्प असायचा. त्या स्टम्पनेच स्ट्रोक लगावण्याचा ते सराव कराचे. जवळपास १०० चेंडू ते सलगपणे खेळून काढायचे. सरावाचा हा त्यांचा नितक्रम झाला होता. या सरावामुळेच त्यांच्या फलंदाजीत जबरदस्त निखार आला. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी आपल्या शाळेच्या संघातून खेळायला सुरूवात केली. शाळेच्या एका सामन्यात त्यांच्या संघाचा एकदा १५६ स्कोर झाला होता. यात ब्रॅडमन यांच योगदान होतं ११५ धावांचं. ब्रॅडमन यांचे हे पहिलेपहिले शतक होते.
डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरूवात वयाच्या १९ व्या वर्षापासून केली. पहिला सामना न्यू साऊथ वेल्सकडून खेळले. शेफील्ड शील्डच्या या पहिल्याच सामन्यात ब्रॅडमन यांना शानदार ११८ धावांची खेळी केली. याच खेळीमुळे त्यांचे नाव चर्चेत आले. आपल्या या पहिल्या सत्रात त्यांनी ५ सामन्यात खेळतांना ४६.२२ च्या सरासरीने एकून ४१६ धावा काढल्या, ज्यात ४ शतके २ अर्धशतके यांचा समावेश होता. याच्या पूढच्याच सत्रात त्यांनी व्हिक्टोरिया संघाविरूद्ध खेळतांना नाबाद ३४० धांवाची सुपर खेळी केली. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेल्या इंग्लंड संघाविरूद्ध एका साध्या सामन्यात ब्रॅडमन यांनी ८७ आणि १३२ धावांचे दोन डाव खेळून ऑस्ट्रेलिया संघाच्या  निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
३० नोंव्हेबर १९२८ ला वयाच्या २०व्या वर्षी ब्रॅडमन इंग्लडं संघाविरूद्ध ब्रिस्बेनला त्यांनी आपला पहिला कसोटी सामना  खेळला. या पहिल्या सामन्यात त्यांनी १८ आणि १ धाव काढली. या असफलतेमुळे त्यांना संघाबाहेर बसवण्यात आले. पण मेलबोर्नच्या तिसर्‍या कसोटीत पुन्हा त्यांना ऑस्ट्रेलिया संघात घेण्यात आलं. या वेळेस त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उठवत पहिल्या डावात ७६ आणि दुसर्‍या डावात ११२ धावा काढल्या. या सामन्यातनंतर त्यानी कधीच मागे वळून बघितलं नाही. इंग्लंडविरूद्धच्या या पहिल्याच मालिकेत त्यांनी ४ कसोटीत ६६.८५ च्या सारासरीने ४६८ धावा जमवल्या यात त्यांच्या २ शतकाचा समावेश होत. या मालिकेत ब्रॅडमन यांना प्रतिभासंपन्न मानण्यात येत होतं.
पुढच्या सत्रात त्यांनी आणखी एक लक्षवेधक खेळी साकारली. न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना त्यांनी क्विंन्सलंड संघाविरूद्ध एका डावात ४५२ धावांची मोठी खेळी खेळून सगळ्यांनाच थक्क केलं. त्या काळात अशी मोठी खेळी खेळण्याचा कुणी विचारसुद्धा करत नव्हतं. १९३० ला ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लडं दौर्‍यावर गेला होता. तिथे ब्रॅडमन यांनी आपला फॉर्म कायम ठेवला. ५ सामन्यांत त्यांनी १३९.१४ च्या सरासरीने विक्रमी ९७४ धावा जमवल्या. नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटीत त्यांनी ८ आणि १३१ धावा काढल्या. लॉर्ड्सवर २५४ लीड्सवर ३३४ आणि ओव्हलवर २३२ धावांचा पाउस पाडला.
(http://encyclopedia.balaee.com)



Saturday, August 6, 2011

अंक १

हा 'फक्त क्रिकेट' या साप्ताहिकाचा पहिला अंक 
या पहिल्या अंकात आपण क्रिकेटचा 'इतिहास' समजून घेऊयात.



क्रिकेटचा ‍इतिहास

क्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद मात्र सापडते. सतराव्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. पण त्याला सध्या असणारा क्रिकेट हा शब्द मात्र, क्रिकेट न खेळणार्‍या फ्रान्स या देशाची भाषा फ्रेंचमधून आला आहे. 

पहिला आंतराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या जगमरात जवळपास २० देशात हा खेळ खेळला जातो. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड या देशात हा खेळ सर्वांत जास्त खेळला जातो. 

क्रिकेटचा प्रसार करण्याचे श्रेयसुद्धा इंग्लंडला जाते. इंग्रजांनी ज्या देशांवर राज्य केले तेथे त्यांचे अधिका‍री क्रिकेट खेळत. त्यामुळे हा खेळ इंग्लंडबाहेर गेला. १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम बनायला सुरूवात झाली. १७७४ मध्ये त्यात प्रथम सुधारणा होत, पायचीत, तीन यष्टी, बॅटची लांबी यांचे नियम ठरवण्यात आले. 

त्यानंतर दोन पंच नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७७८ साली लॉर्डसवर एमसीसी क्लबची स्थापना करण्यात आली. १७५१ साली यॉर्कशायर हे सामन्याचे पहिले अधिकृत ठिकाण ठरले. १७६० मध्ये गोलंदाजी चेडू टाकू लागले. फिरकी गोलंदाजी करू लागले. १७७२ मध्ये धावफलक निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या सुरवातीला लंडन व डार्टफोर्ड हे दोन क्लब अस्तित्वात आले. 

पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये अमेरिका व कॅनडात झाला. १८५९ मध्ये इंग्लंडचे व्यावसायिक खेळाडू उत्तर अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले. १८६४ मध्ये ओव्हरआर्म गोलंदाजी टाकण्यात येऊ लागली. १८७७ मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली. १८८२ मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली. 

१८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी खेळणारा तिसरा देश म्हणून मान्यता मिळाली. १८८९ पर्यंत एक षटक चार चेंडूंचे होते. त्यानंतर पाच चेंडूंचे एक षटक झाले, तर १९०० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले. त्यानंतर आठ चेंडूंचे एक षटक करण्याचा प्रयोगही या क्रिकेट खेळणार्‍या तीन देशांमध्ये झाला. पुन्हा १९४० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले. 

दुसर्‍या महायुध्दाच्या आधी भारत, वेस्ट इंडीज व न्यूझीलंड या तीन देशांना कसोटी खेळण्याची मान्यता मिळाली. युध्दानंतर पाकिस्तानलाही कसोटी खेळणारा देश म्हणून मान्यता मिळाली. विसाव्या शतकाच्या शेवटी श्रीलंका, झिंबाव्वे व बांगलादेश यांनाही मान्यता मिळाली. अशा तर्‍हेने क्रिकेट सर्वत्र पसरत गेले