Pages

Monday, March 26, 2012

अंडर-आर्म गोलंदाजी

ऑस्ट्रेलियातील १९८१ च्या मोसमातील तिरंगी मालिकेतील (तेव्हा त्या मालिकेला वर्ल्डसेरीज असे नाव असायचे) अंतिम फेरीतील तिसरा सामना. (पाच अंतिम सामने असायचे, best of five)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील, मेलबोर्न, १ फेब्रु १९८१.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ४ बाद २३५ धावा केल्या. कर्णधार ग्रेग चॅपेलचा वाटा होता ९० धावांचा.

शेवटचे षटक चालू झाले तेव्हा न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १५ धावा हव्या होत्या. गोलंदाजी करत होता ट्रेव्हर चॅपेल. (चॅपेल बंधूंपैकी सगळ्यात लहान).

पहिल्या चेंडूवर रिचर्ड हॅडलीने चौकार मारला पण दुसर्‍या चेंडूवर बाद झाला. तिसर्‍या आणि चौथ्या चेंडूवर दोन-दोन धावा निघाल्या पण पाचव्यावर विकेट पडली. ब्रायन मॅक्केशनी हा नवा फलंदाज मैदानात होता, १ चेंडू, बरोबरीसाठी ६ हव्यात आणि जिंकण्यासाठी ७.

शेवटचा चेंडू टाकण्यासाठी ट्रेव्हर सज्ज झाला, ग्रेगने पळत जाऊन त्याला सूचना दिली, ट्रेव्हरने पळत येऊन चेंडू अंडर-आर्म सरपटी टाकला.



फलंदाजाने रागाने त्याला नुसती बॅट लावली.

ऑस्ट्रेलियाने ६ धावांनी सामना जिंकला.

नंतर सगळीकडे गदारोळ चालू झाला. न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणाले, क्रिकेटच्या इतिहासातील लाजिरवाणी घटना, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, झालं ते काही चांगलं नाही झालं..
डॉन ब्रॅडमननी या काहीही करुन जिंकण्याच्या मनोवृत्तीबद्दल खेद व्यक्त केला.

नंतर आयसीसीने नियम बदलले आणि अशा प्रकारे चेंडू टाकणे नियमबाह्य ठरवले. (टाकला तेव्हा ते नियमात बसत होते.

2 comments:

सचिन said...

’जिंकण्यासाठी वाट्टेल ते" ही ऑस्ट्रेलियन संघाची मनोधारणा पूर्वीपासूनच आहे. मला आठवतंय १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरूद्ध बांगलादेश सामन्यात स्टीव वॉ आणि मायकेल बेव्हन मुद्दाम हळू खेळले. हेतू हा की वेस्ट इंडिजचा नेट रन रेट न्यूझिलंडहून जास्त रहावा. न्यूझिलंड्ने ऑस्ट्रेलियाला हरवले होते; त्यामुळे समान गुणसंख्या झाली असताना त्यांना फायदा मिळाला असता. म्ह्णून स्टीव वॉने धोरणीपणे वेस्ट इंडिजला त्यांच्या पुढे ठेवले. जेव्हा ह्या हळू खेळाबद्दल गदारोळ झाला तेव्हा त्याने दिलेले उत्तर पण अत्यंत मार्मिक होते. - "We are not here to win friends, mate. We are here to win the tournament."

- सचिन

Watercolorsmita said...

http://www.youtube.com/watch?v=QIjCpPStHnE
last over (under arm ball)

Post a Comment