Pages

Saturday, November 19, 2011

वीरेंद्र सेहवाग


भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा म्हणजे वीरेंद्र सेहवाग. आज टेस्टमध्ये टीम इंडिया -या अर्थाने नंबर वन बनलीय . टीम इंडियाला नंबर वन बनवण्यात सेहवागच्या खेळाचा मोठा वाटा आहे. टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय सेहवागन एकहाती मिळवून दिलेत. टेस्ट असो वन डे असो की टी २०. सेहवागची आक्रमकता ही कायम असते. टेस्टमध्ये तो ओपनिंगला येतो. आल्या आल्या तो विजेसारखा सुटतो. त्याची ३०-४० बॉलमध्ये ५० करतो. समोरचा फलंदाज तेव्हा ३० बॉल - असा खेळत असतो.

राहुल द्रविड सोबत त्याची भागीदारी चांगलीच होते. एका बाजूला द्रविड हळू हळू बॉल बघून खेळत असतो. तर दुसरीकडे सेहवाग आक्रमक खेळत असतो. मुंबई असो वा लंडन, मेलबोर्न असो वा बार्बाडोस कोणत्याही खेळपट्टीवर तो आक्रमक चांगलाच 
खेळतोक्रिकेटमधले पारंपारिक नियम, रुढी, परंपरा यांच्यात ती कधीही अडकत नाही. कोणत्याही परंपरेत त्याला बंदिस्त करता येत नाही.सेंच्युरी जवळ आली तरी त्याची धावगती कमी होत नाही. समोरच्या बॉलर्सच दडपण तो कधीही घेत नाही.

T-20 मध्ये 200 धावांचा पाठलाग असो अथवा टेस्टमध्ये 1 दिवसात 400 रन्स.... वीरुची बॅट चालली की कोणतही टार्गेट अशक्य नसंत. चांगल्या बॉलचा आदर करायचा... खराब चेंडूची वाट बघायची या सारख्या पारंपारिक कल्पना त्याला रुजत नाहीत. द्रविड, लक्ष्मण या सारख्या फलंदाजांप्रमाणे तो बॉलशी  वाटाघाटीही कधी करत नाही. येणा-या प्रत्येक बॉलवर तुटून पडणे एवढाच एक मंत्र त्याच्या रक्तात आहे.

खेळताना त्याचे पाय हलत नाहीत... नो प्रॉब्लेम.. पण संघाचा धावफलक तरी हलतो ना.अगदी बॉलर्सला धाप लागेल इतक्या वेगाने तो पळत असतो. उसळत्या चेंडूंचा तो सामना करु शकत नाही अशी टीका नेहमी केली जाते. पण अशा चेंडूवर तो नेहमी कोसळतो असे नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका या देशातल्या वेगवान खेळपट्टीवर त्याने शतक झळकावली आहेत.तंत्र हेच पूर्णब्रम्ह हे सत्य त्यानं कधीही स्विकारले नाही. रिझल्ट एकच. बॉलर्सचे डोळे पांढरे होणे.

टेस्ट क्रिकेटमध्ये दोनदा ३०० पेक्षा जास्त धावा त्याने केल्या आहेत. भारतातला अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. असे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. आत्ता इंडीज वा भारतामध्ये टेस्ट सिरीज चालू आहे. यामध्ये त्याचा आणखी एक विक्रम होऊ शकतो. तो म्हणजे टेस्टमधील १००वी सिक्स. हे अजून एक त्याच्या आक्रमकतेचे उदाहरण आहे.

0 comments:

Post a Comment