Pages

Saturday, September 17, 2011

महेंद्रसिंग धोनी


महेंद्रसिंग धोनी
२००७ चा इंग्लंड दौरा संपता संपता द्रविडने कर्णधारपद सोडले आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला - आयसीसी वर्ल्ड टी२० साठीकप्तान म्हणून धोनीची ही पहिलीच परीक्षा होतीसंघ पण  तरुणअननुभवी होतासाहजिकच भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हणून कोणी गृहीत धरले नव्हतेही स्पर्धा जिंकून धोनीने आपल्या कप्तानपदाचा श्रीगणेशा केलाआता जेंव्हा एकदिवसीय  सामन्यांसाठी कर्णधार निवडायची वेळ आली तेंव्हा साहजिकच धोनीचं  नाव सगळ्यात पुढे होतंसचिनला कप्तान करा असा देखील सूर निघाला पण खुद्द सचिनने सांगितले की आता ही धुरा तरुण खेळाडूकडे सोपवा. 
धोनी एकदिवसीय संघाचा कर्णधार झाला तो पहिली स्पर्धा   ऑस्ट्रेलिया मधील तिरंगी स्पर्धा खेळला ही ऑस्ट्रेलियामध्ये होणारी शेवटची तिरंगी स्पर्धा होती . भारताने पहिल्या दोन्ही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला  लीलया पराभूत केले आणि प्रथमच ही स्पर्धा जिंकलीकसोटी संघाचा कर्णधार अनिल कुंबळे निवृत्तीकडे झुकलेला असल्याने धोनी आता कसोटी कर्णधार होणे ही केवळ औपचारिकता राहिली होतीऑस्ट्रेलियाचा संघ  आपल्याकडे आला तेंव्हा ती पूर्ण झालीकुंबळे आणि गांगुलीने निवृत्ती जाहीर केली आणि कर्णधार म्हणून धोनीची 'कसोटीसुरु झालीत्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन कसोटी जिंकून देऊन बोर्डर-गावस्कर चषक भारतातून परत जाणार नाही याची दक्षता घेतलीत्यानंतर सुरु झाली विजयाची घोडदौड - आशिया कपश्रीलंकाइंग्लंड यांचे भारत  दौरेआपला न्यूझीलंड दौरासगळीकडे आपण विजय मिळवलेधोनीने पहिल्या ११ कसोटी सामन्यात एकही पराभव स्वीकारला नव्हता आणि २००९ पर्यंत त्याने केवळ  कसोटी सामने गमावले होते (कर्णधार  म्हणून).  डिसेंबर २००९ मध्ये  आपण कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि ते स्थान इंग्लंड दौऱ्यापर्यंत अबाधित होते2010 मध्ये  ऑस्ट्रेलियाला व्हाईट-वॉश देऊन आपण ऐन ऍशेसच्या तोंडावर त्यांना पराभवाची चव चाखायला लावलीतेव्हाच  एकदिवसीय मालिका पण खिशात टाकून आपण कांगारूंना हात हलवत मायदेशी पाठवले (सुनील गावस्कर म्हणतात की गेल्या संपूर्ण शतकात कांगारूंना असे कोणी परत पाठवलेले त्यांना आठवत नाही!!!) कप्तान म्हणून धोनीने २०१० पर्यंत  एक पण कसोटी मालिका गमावलेली नव्हती.                    


  कॅप्टन कूल अशी बिरुदावली मिरवणारा धोनी मैदानात नेहमीच शांत असतोकितीही बिकट परिस्थिती असेल किंवा कितीही चांगली परिस्थिती असेल तरी  धोनीच्या चेहऱ्यावरचे चित्र बदलत नाही . सहकाऱ्यांवर तो कधी आगपाखड करताना दिसत नाही (अजून पण गांगुलीकुंबळे एखाद्या खेळाडूकडून फिल्डिंग मध्ये चूक झाली की वैतागतातखरं तर त्या दोघांनाही तो नैतिक  अधिकार नाहीये!!!)

0 comments:

Post a Comment