Pages

Sunday, September 11, 2011


राहुल द्रविड


राहुल द्रविड एक महान खेळाडू आहे यात शंकाच नाही. आपल्या तोंडात कसोटी सामना बघताना काही असेच उद्गार असतात, जसं की द्रविड आहे ना मग आपण जिंकणार.
करीयरच्या सुरवातीला जिमी म्हणून फेमस झालेला द्रविड नंतर ' वोल' या नावाने ओळखला जातो. काही दिग्गज फलंदाज ज्या खेळपट्टीवर अजिबात खेळू शकत नाहीत 
त्या खेळपट्टीवर कसोटी सामन्यात एकटा द्रविड खेळू शकतो असे मला वाटते. त्याने अनेक कसोटी सामने हरता हरता एकहाती वाचवले आहेत. अनेक जिंकवले सुद्धा 
आहेत. खरंतर द्रविड अजून अनेक विक्रम करू शकतो पण आता त्याचे करीयर संपत आले आहे

२००३ चा विश्वचषक आठवतोय ? तो विश्वचषक एका गोष्टीमुळे खूप फेमस झाला होता. ती गोष्ट म्हणजे त्या विश्वचषकात द्रविड फिल्डर असतानाही भारताकडे विकेट कीपर 
नसल्याने त्याने विकेट कीपिंग (पूर्ण वर्ल्ड कप) केली होती. द्रविडला खूप वेळा ओपनिंगला पाठवले, पाच विकेट गेल्यावर पाठवले पण तरी त्याने एकसारखीच चांगली 
कामगिरी केली. सुरवातीला द्रविड फार चांगला नाही खेळायचा म्हणून त्याला वन डे संघातून काढून टाकले होते. पण काही महिन्यानंतर त्याला फॉर्म गवसला त्याने 
कसोटीत चांगली कामगिरी करून ती जागा परत घेतली

द्रविडच्या कासोतीतल्या खेळाला मात्र तोड नाही. त्याची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. तो भारतासाठी सर्वात चांगला कसोटी खेळाडू आहे. अगदी सचिनपेक्षा सुद्धा.

द्रविडने कसोटीत १५७ सामन्यात १२७७५ धावा केल्या आहेत. तर वन डे मध्ये ३४१ सामन्यात १०८०२ धावा केल्या आहेत.

1 comments:

मिलिन्द बाम said...

छान.

द्रविडला सुरुवातीला जॅमी असे टोपणनाव होते (त्याचे वडिल, किसान जॅम्समध्ये नोकरी करत म्हणून ते नाव).

"तो भारतासाठी सर्वात चांगला कसोटी खेळाडू आहे. अगदी सचिनपेक्षा सुद्धा." असं का वाटतं तुला ते वाचायला आवडेल.

याबद्दल माझे मत वेगळे आहे.

Post a Comment