Pages

Saturday, August 20, 2011

अंक ३



कपिल देव

भारताला विश्र्वचषक मिळवुन देणारा कर्णधार चारशेच्या वर बळी घेणारा द्रुतगती  गोलंदाज एक परिपुर्ण अष्टपैलु खेळाडू आणि तंदूस्तीचा वस्तूपाठ घालुन देणारा क्रिकेटपटू म्हणून क्रिकेटविश्वात  कपिलदेवचा विशेष लौकिक आहे. विस्डेन फाईव्ह क्रिकेटर्स ऑफ द सेंच्युरी मध्ये गणना झालेला खेळाडू म्हणुनही त्याची विशेष ख्याती आहे.
कपिलदेव रामलाल निखंज याचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी चंदिगढ हरयाना येथे झाला फैसलाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्याद्वारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं व भारताला  रमाकांत देसाईनंतर गोलंदाज लाभला आणि भारतीय क्रिकेटचा एक नवा अध्याय सुरू झाला. त्याच्या परिणामकारक गोलंदाजीला आक्रमक फलंदाजीचीही जोड होती क्षेत्ररक्षणातही तो चोख होता कपिलदेवच्या अशा अष्टपैलूत्वामूळे भारतीय संघामध्ये एका अर्थाने समतोल प्राप्त झाला. केवळ २५ कसोटी सामन्यांमध्ये १०० बळी आणि १००० धावा पुर्ण करून त्याने आपलं अष्टपैलुत्व सिद्ध  केलं
आपल्या १६ वर्षाच्या (१९७८;९४) प्रदीर्घ अशा कसोटी क्रिकेट कारकीदीत त्याने १३१ सामन्यांमध्ये २९.६४ च्या सरासरीने ४३४ बळी प्राप्त केले भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा व तसेच त्याने डावात ५ वा ५ पेक्षा जास्त बळी धेण्याची किमया केली आणि ८३ धावांत ९ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. फलंदाजीतही त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे त्याने ३१.५ च्या सरासरीचा  समावेश आहे. १६३ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या
एकदिवसीय सामन्यांमधील वेगळया स्वरूपाच्या क्रिकेटशी कपिलदेवने चांगलं जुळवून  घेतलं २२५ सामन्यामध्ये त्याने २७.४५ च्या सरासरीने २५३ बळी घेतले आणि २३.७९ च्या सरासरीने ३,७८३ धावा केल्या १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याने काढलेल्या झंझावती १७५ धावाही त्याची सर्वोच  धावसंख्या आणि सर्वोतम कामगिरी ठरली या स्पर्धेतील झिबांब्वेविरूध्दच्या सामन्यात भारतीय संघाची ५ बाद २० अशी नामूष्की झाली होती तेव्हा कपिलने त्याच्या घणाघाती खेळाने  १७५ धावा करून एकहाती भारतीय संघाची नौका किनार्याला लावली होती.
कपिलच्या अष्टपैलु खेळामूळे कसोटी पदार्पण केल्यावर अल्पावधीतच त्याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सुत्र देण्यात आली कपिल परिपुर्ण कप्तान म्हणुन ख्यात नसला तरी त्याच्या जिगरबाज स्वभावामुळे भारतीय संघामध्ये सकारत्मक दृष्टीकोन विकसित झाला इतकं निश्चित.त्याने १९८३ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक प्राप्त करून दिला आणि त्यांच्या विजिगिषू प्रवृतिमूळे तो भारतीयांच्या गळयातील ताईतच झाला.
कपिलदेवच्या क्रिकेट कारकिर्दीतचतील बहूमोल कामगिरिमूळे त्याला अनेक पुरस्कार व बहूमान प्राप्त झाले. त्यांत सर्वोकूष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून  १९७८ साली अर्जुन पुरस्कार १९८० पद्मश्री १९८१ विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर १९८३ पद्मभूषण इ. पुरस्कार मिळाले . इ. स. १९९४ मध्ये कपिलदेवने निवृती पत्करली पण तंदुरूस्तीसाठी आदर्श ठरलेला हा खेळाडू पुढील पिढयातील खेळाडुंना कायम प्रेरणादायी ठरला.

(http://encyclopedia.balaee.com)

2 comments:

वैशाली said...

आदित्य,

कपीलदेव चा खेळ मी पाहिला आहे. आणि त्याच्या १७५ धावा तर कायम लक्षात राहणार्याच आहेत. अतिशय लोकप्रिय असात तो खेळाडू होता.

पुढच्या WC साठी मतदान हवे आहे पण आत्ता पासून मत देणे अवघड वाटते. कारण सध्या इंग्लंड बरोबरची भारताची अवस्था बघता हीच का ती WC जिंकलेली टीम का असे वाटते. त्यामुळे त्याबद्दल आत्ता काही न बोलणेच बरे.

वैशाली

विद्या कुळकर्णी said...

कपिलदेव मध्यमगती गोलंदाज होता ना?
भारताने ८३ त विश्वचषक जिंकला तेव्हा हा फोटो वर्तमानपत्रात आला होता.
आमच्या वाड्यात लोक रेडिओवर ’धावते समालोचन’ ऎकत जागत बसल्याचे आठवते. मी झोपले होते. मी दुसर्‍यादिवशी वर्तमानपत्रातच पाहिले/वाचले.
तेव्हाचा जल्लोष आठवला.

Post a Comment