Pages

Friday, August 12, 2011

अंक २




या अंकापासून आपण क्रिकेटमधील काही दिग्गज खेळाडूंची माहिती घेऊ .

डॉन ब्रॅडमन


क्रिकेटच्या इतिसात टेस्ट क्रिकेटमध्ये ९९.९४ ची सरासरी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९५.१४ ची सरासरी राखणारा एकमेव क्रिकेटपटू डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन आपल्या अफलातून फलंदाजीमुळे आजच्या पिढीत चर्चित आणि लोकप्रिय झाले. क्रिकेटच्या इतिहासातील मागची पाने चाळून बघितली तर सर डॉन ब्रॉडमन यांच्या अद्भुत फलंदाजीबद्दल आजच्या पिढीतल्या तरूणांनाही मोंठ आश्चर्य वाटतं. विशेष म्हणजे आज क्रिकेटमधल्या सुखसोयी, पैसा हे सगळं वाढलं असतानाही ५२ कसोटीत २९ शतके ठोकणारा आणि टेस्ट क्रिकेटमधली आपली सरासरी ९९.९४ इतकी ठेवणार्‍या ब्राडमन यांच्यासारखा दुसरा क्रिकेटपटू जन्माला जायचा आहे.
ब्रॉडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ ला ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समधल्या कुरमुंडरा गावात झाला. इथेच ब्रॅडमन यांचं बालपण गेलं. नंतर त्यांचा परिवार बाऊरल इथे आला. कारण त्यांच्या वडिलांना तिथे सुताराचे काम मिळाले होते.लहानपणी ब्रॅडमन एका गोल्फच्या चेडूने क्रिकेट खेळायचे. आपल्यासोबत खेळायला कुणी नसलं की बॅ्रडमन एका मोठया पाण्याच्या टाकीवर जोरात चेंडू फेकून मारायचे  आणि मग तो मारलेला चेंडू परत आपल्याकडे आला की ते त्याच्यावर वेगवेगळे स्ट्रोक मारायचे. त्या वेळी त्यांच्या हातात बॅट एवजी एक स्टंम्प असायचा. त्या स्टम्पनेच स्ट्रोक लगावण्याचा ते सराव कराचे. जवळपास १०० चेंडू ते सलगपणे खेळून काढायचे. सरावाचा हा त्यांचा नितक्रम झाला होता. या सरावामुळेच त्यांच्या फलंदाजीत जबरदस्त निखार आला. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी आपल्या शाळेच्या संघातून खेळायला सुरूवात केली. शाळेच्या एका सामन्यात त्यांच्या संघाचा एकदा १५६ स्कोर झाला होता. यात ब्रॅडमन यांच योगदान होतं ११५ धावांचं. ब्रॅडमन यांचे हे पहिलेपहिले शतक होते.
डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरूवात वयाच्या १९ व्या वर्षापासून केली. पहिला सामना न्यू साऊथ वेल्सकडून खेळले. शेफील्ड शील्डच्या या पहिल्याच सामन्यात ब्रॅडमन यांना शानदार ११८ धावांची खेळी केली. याच खेळीमुळे त्यांचे नाव चर्चेत आले. आपल्या या पहिल्या सत्रात त्यांनी ५ सामन्यात खेळतांना ४६.२२ च्या सरासरीने एकून ४१६ धावा काढल्या, ज्यात ४ शतके २ अर्धशतके यांचा समावेश होता. याच्या पूढच्याच सत्रात त्यांनी व्हिक्टोरिया संघाविरूद्ध खेळतांना नाबाद ३४० धांवाची सुपर खेळी केली. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेल्या इंग्लंड संघाविरूद्ध एका साध्या सामन्यात ब्रॅडमन यांनी ८७ आणि १३२ धावांचे दोन डाव खेळून ऑस्ट्रेलिया संघाच्या  निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
३० नोंव्हेबर १९२८ ला वयाच्या २०व्या वर्षी ब्रॅडमन इंग्लडं संघाविरूद्ध ब्रिस्बेनला त्यांनी आपला पहिला कसोटी सामना  खेळला. या पहिल्या सामन्यात त्यांनी १८ आणि १ धाव काढली. या असफलतेमुळे त्यांना संघाबाहेर बसवण्यात आले. पण मेलबोर्नच्या तिसर्‍या कसोटीत पुन्हा त्यांना ऑस्ट्रेलिया संघात घेण्यात आलं. या वेळेस त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उठवत पहिल्या डावात ७६ आणि दुसर्‍या डावात ११२ धावा काढल्या. या सामन्यातनंतर त्यानी कधीच मागे वळून बघितलं नाही. इंग्लंडविरूद्धच्या या पहिल्याच मालिकेत त्यांनी ४ कसोटीत ६६.८५ च्या सारासरीने ४६८ धावा जमवल्या यात त्यांच्या २ शतकाचा समावेश होत. या मालिकेत ब्रॅडमन यांना प्रतिभासंपन्न मानण्यात येत होतं.
पुढच्या सत्रात त्यांनी आणखी एक लक्षवेधक खेळी साकारली. न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना त्यांनी क्विंन्सलंड संघाविरूद्ध एका डावात ४५२ धावांची मोठी खेळी खेळून सगळ्यांनाच थक्क केलं. त्या काळात अशी मोठी खेळी खेळण्याचा कुणी विचारसुद्धा करत नव्हतं. १९३० ला ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लडं दौर्‍यावर गेला होता. तिथे ब्रॅडमन यांनी आपला फॉर्म कायम ठेवला. ५ सामन्यांत त्यांनी १३९.१४ च्या सरासरीने विक्रमी ९७४ धावा जमवल्या. नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटीत त्यांनी ८ आणि १३१ धावा काढल्या. लॉर्ड्सवर २५४ लीड्सवर ३३४ आणि ओव्हलवर २३२ धावांचा पाउस पाडला.
(http://encyclopedia.balaee.com)



4 comments:

मिलिन्द बाम said...

मस्तच..

दुसर्‍या महायुद्‍धामुळे कसोटी क्रिकेट ४~५ वर्षे बंद होते. त्या काळात जर ब्रॅडमन खेळू शकले असते तर त्यांचे विक्रम कुठे पोचले असते ?
१९२८ ते १९४८ या २० वर्षात ते फक्त ५२ कसोटी खेळले.

लीडस कसोटीत केलेल्या ३३४ धावांपैकी ३०९ या एका दिवसात केल्या होत्या. (उपाहारापूर्वी शतक, चहापानापूर्वी द्विशतक)

Gautami said...

वा! मस्तच. अशी माहिती वाचायला भारी वाटतं! हा उपक्रम असाच चालू रहावा यासाठी खूप शुभेच्छा!!
- गौतमी

दीपश्री said...

अदीत्य,खूप खास.

सचिन said...

मस्त माहिती दिली आहेस, आदित्य! ब्रॅडमनला ’क्रिकेटचा देव’ का मानतात हे त्याच्या खेळींचे वर्णन ऐकले की लक्षात येते. ’बॉडी लाइन’ गोलंदाजी (फलंदाजाच्या अंगावर ठेट आणि वेगाने चेंडू फेकणे) ह्या नंतर बंदी आणल्या गेलेल्या गोलंदाजी शैलीचा उगम फक्त त्याच्या धावा रोखण्यासाठी झाला ह्यावरूनच त्याची महानता सिद्ध होते.

- सचिन

Post a Comment